Slider Image
Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

रानवड  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. रानवड  गावात सोमेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिरामध्ये श्री राम, सीता, लक्ष्मण व विठ्ठल रुक्मानी यांचे मंदिरे आहे  शनीमंदिर  असून हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३६८५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे ४  व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०१८ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत रानवड   ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

रानवड  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रानवड  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

रानवड येथे कर्मावरी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान आहे. कारखान्यामुळे रानवड मधील व इतर गावांमधील ऊस उत्पादक यांना उत्पन्न मिळते तसेच अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतो  तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच रासाका परिसरातील गावांच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. तसेच अनेक तरुण या परिसरात छोटे-मोठे व्यवसायदेखील करणार असल्याने रानवड  गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

रानवड  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ   १५७२  हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण ७२२  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३६८५  आहे. त्यामध्ये १८९२ पुरुष व १७९३ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावामधे कराबाई नदी असून  ओझरखेड बंधारा  पाट हा ६ किमी असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

रानवड  गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

रानवड गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

रानवड  च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष १८९२
स्त्रिया १७९३
एकूण ३६८५

संस्कृती व परंपरा

रानवड  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात मारुती यात्रा हि अक्षय तृतीया ला मोठ्या उत्साहात ३ दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे रानवड गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख गावात सोमेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिरामध्ये श्री राम, सीता, लक्ष्मण व विठ्ठल रुक्मानी यांचे मंदिरे  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी  साप्ताह व भागवत कथा या  धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

बारव – गावाच्या असलेले हे पुरातन काळातील आहे.

शेती क्षेत्र व द्राक्षबागा – रानवड  द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.

जवळची गावे

रानवड  गाव निफाड तालुक्यातील उत्तरेला असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे रानवडशी  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

कुंभारी दुर्डी रेडगाव नांदूर खु पालखेड सावरगाव वनसगाव ब्राम्हणगाव वनस उगाव खेडे  हि गावे रानवड च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.क्र. सदस्याचे नाव पद भ्रमणध्वनी क्रमांक
गायकवाड संगीता सिद्धार्थ सरपंच ८६०५८९८६९२
वाढवणे गणेश दादा उपसरपंच ८३२९०५५३९०
वाघ बाळासाहेब परशराम सदस्य ९८२२९६७०५७
सोमवंशी माधुरी योगेश सदस्य ९९६०९३५५२७
वाघ विलास गंगाधर सदस्य ९८५००३६३१३
वाघ सचिन अशोक सदस्य ९८५०३०३०८२
वाघ वंदना प्रदीप सदस्य ९२७०७७४५२५
वाढवणे राजश्री संजय सदस्य ७०२०००२१४६
पवार सागर रोहिदास सदस्य ९१४६२७७६४७
१० वाघ दीपिका ओंकार सदस्य ७७७६८५४३९७
११ जाधव उषा विलास सदस्य ९९२२७१८९४१

लोकसंख्या आकडेवारी


७२२
३५६७
१८९२
१७९३
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11
Logo 12